Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray Group) सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका होत आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या यादीत अजून एक नावाची भर पडली आहे. नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटलेले शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कीर्तिकारांनी घेतलेल्या निर्णयाची टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) गजानन कीर्तिकारांचा मुलगा अमोल कीर्तिकरला (Amol Kirtikar) भेटल्यानंतर बोलत होते.

 

अमोल कीर्तिकारांच्या वडिलांनी जरी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडले असले, तरी अमोल अजूनही याच गटात आहेत. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) बाहेर आल्यानंतर त्यांना भेटायला अमोल कीर्तिकर गेले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा मध्यवर्ती निवडणुकांचा दावा केला आहे. ते म्हणाले,’ महाराष्ट्राचे राजकारण प्रचंड अस्थिर झालेय, उद्धव ठाकरे सांगतायत ते खरे आहे. दिल्लीत मध्यवर्ती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. पण फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो.’ अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) निशाणा धरत केली आहे.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून बाहेर चाललेल्या प्रकल्पाबद्दल मत नोंदवले. ‘महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांबद्दल कोणीच काही बोलत नाही.
एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत, यावर महाराष्ट्राच्या हितासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे आहे.
राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी सगळा जन्म आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही,
याचे भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवले पाहिजे.’ असा सल्ला संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena thackeray group sanjay raut criticised balasahebanchi shivsena shinde group after gajanan kirtikar joins

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’