‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण बंद झाले. त्यामध्ये मुंबई, नागपूर, सातारा, पुण्यातही लसींचा साठा शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. या लसींच्या तुटवड्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच सामनामधून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.

सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल, असे आजच्या अग्रलेखात म्हटले. तसेच अनेक ठिकाणी लसींचा मोठा प्रमाणात तुटवडा आहे. या सर्व बाबींनंतरही पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. महाराष्ट्राला लसींचा मुबलक पुरवठा होत नाही. त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवत आहे. तर लसींअभावी अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. याच लसींच्या तुटवड्यावरून महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत.

महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल.