‘तंगडे’ तोडण्याची ‘भाषा’ इथं चालणार नाही, सगळ्यांना तंगड्या असतात, राऊतांचे उदयनराजेंना ‘प्रत्युत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये चांगलेच वाक् युद्ध पेटल्याचे पहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे संजय राऊत यांनी मागितल्याने या वादाला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, भारतात लोकशाही आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही, तंगड्या सगळ्यांना असतात, हे लक्षात ठेवावं.

काही विषयावरून काही जणांनी वादाला तोंड फोडले. त्यामुळे आम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागली. तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक यांच्याबाबत काहीही बोलाल, हे कसे काय खपवून घेतले जाईल. आम्ही तुमचा आदर राखतो. तुम्हीही आमचा आदर राखा. देशात लोकशाही आहे, येथे तंगड्या तोडण्याची भाषा वापरणे योग्य नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

11 कोटी जनता छत्रपतींचे वंशज
हात-पाय तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची व्यक्तीगत मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांची वारसदार आहे. त्यामुळे सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर अधिकार आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

छत्रपतींचे वंशज म्हणून तूमचा आदर
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात. म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. परंतु तुम्ही हात पाय तोडण्याची भाषा करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कोणी अशी भाषा केली असती तर महाराजांनी त्याचेही हाय-पाय तोडले असते, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

भाजप नेता जयभगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार विरोध केला होता. तसेच भाजपमध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनादेखील त्याला विरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, उदयनराजे यांनी भाजपला प्रश्न विचारण्याऐवजी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी त्यांच्या टीकेला प्रत्यत्तर दिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/