संजय राऊतांचे इंदिरा गांधींबद्दलचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य ‘मागे’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी काल भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दल केलेले वक्तव्य बऱ्याच वादानंतर आज मागे घेतले आहे. संजय राऊत म्हणाले की माझ्या वक्तव्याने कोणाला वाटत असेल की इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन होत आहे, कोणाच्या भावनांना ठेच पोहचत असेल तर मी माझे ते वक्तव्य मागे घेतो.

संजय राऊत यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान वक्तव्य केले होते की करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या. राऊतांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षानंतर आज अखेर संजय राऊतांनी आपले विधान मागे घेतले आहे.

खासदार संजय राऊत यांनी काल एक गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले की, करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या. संजय राऊत पुढे म्हणाले की, मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे, दाऊद बरोबर बोललो आहे आणि एवढेच नाही तर दाऊदला दम सुद्धा दिला आहे असा दावा संजय राऊतांनी करुन सर्वांना आश्चर्यचकित केले.

ते पुढे म्हणाले तेव्हाच काळ हा खूप वेगळा होता, आताची परिस्थिती फार वेगळी होती. तेव्हा मोठमोठी गुंड ही मुंबईत राहून सत्तेच्या चाव्या फिरवत होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असेही संजय राऊत यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/