सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांच्या मनात कचरा : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबीरात सावरकरांसंबंधित एका पुस्तकाचे वाटप करण्यात आले. आता हा मुद्दा वादाचा ठरला आहे. या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. त्यावर बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मनात कचरा असल्याचे परखड मत व्यक्त करत काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरातील पुस्तकाचा समाचार घेतला.

संजय राऊत म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर महान होते आणि कायम असतील. जे लोक त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्या मनात कचरा आहे. मग ते कोणीही असतील. कोणत्याही फालतू पुस्तकाने आमच्या मनातील सावरकरांसंबंधित आदर कमी होणार नाही असे ही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण शिबिरात वीर सावकर कितने वीर या नावाच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या पुस्तिकेत सावरकर यांच्या संंबंधित वेगवेगळ्या घटना, प्रश्न, वादासंबंधित माहिती देण्यात आली आहे. नथूराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत देण्यात आलेल्या विधानावर वाद सुरु झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/