Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चिपळून पुरस्थितीची पाहणी दौऱ्यावर गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे (Shivsena) नेते चांगलेच संतापले आहेत. त्यातच आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेत आज अनेक खासदारांना ओळखले जात नाही. परंतु शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. तो नारायण राणे, तो आमुक-तमुक असं बोलत नाही. हा शिवसेनेचा आहे असे म्हणूनच ओळखतात, असे म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) राणेंना टोला लगावला.

Sanjay Raut takes dig on narayan rane saying even if shiv sainik joins any party his identity remains as shivsainik

सोनई येथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh), सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आदी उपस्थित होते. संजय राऊत पुढे म्हणाले, सहकार सम्राटांची ओळख असलेला अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा व्हावा, ज्या जागा आपण हरलो आहोत त्या देखील आपल्याला जिंकायच्या आहेत. सहकाराची जाण असलेले शंकरराव गडाख शिवसेनेत आहेत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. गडाख निवडून आल्यानंतर सुरुवातीपासून शिवसेनेसोबत उभे आहेत कुंपनावर नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

मोदी मला म्हणतात कैसे हो भाई ?

सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का ? असा दम देऊ
शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मी समोरून जात असताना मोदी (PM Narendra
Modi) थांबून म्हणतात कैसे हो भाई ? यला म्हणतात सत्ता, पॉवर. सत्ता असो वा नसो तरी
शिवसेना साईलने अधिकाऱ्यांकडून कामे करु घ्या, असे संजय राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेत माज पाहिजेच

शिवसेनेत आहे म्हणजे माज, मस्ती पाहिजेच. मग कोणी माजोरडा म्हणो, गुंड म्हणो किंवा मवाली.
वाघासारखे जन्माला आलो वाघासारखे मरणार… शंकरराव गडाख सध्या सौम्य बोलतात. तुम्हीही
हळूहळू डरकाळी फोडाल अशा शैलीत खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

PAN | तुमच्या PAN चं चौथं अन् पाचवं ‘अक्षर’ असतं खुपच ‘विशेष’, जाणून घ्या यावरून काय समजतं

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sanjay Raut takes dig on narayan rane saying even if shiv sainik joins any party his identity remains as shivsainik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update