Sanjay Raut | संजय राऊत फिरवणार फासा? राऊतांच्या ट्विटने सर्वांच्या नजरा आणखी एका पत्रकार परिषदेकडे !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sanjay Raut | महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि भाजपमध्ये (BJP) ईडीच्या (ED) होणाऱ्या कारवायांवरून मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातील चर्चांणा उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी, खेळ लवकरच सुरू होणार, पत्रकार परिषद घेणार, अशा शब्दात सूचक असं ट्विट केलं आहे.

 

खेळ नुकताच सुरू झाला आहे, पंतप्रधान कार्यालयाकडे (Prime Minister’s Office) केंद्रीय एजन्सीजच्या (Central agency) अधिकारांचा गैरवापर (Abuse) करून काही जणांना वेठीस धरण्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी ‘वसुली एजंट्स’ मार्फत खंडणी आणि ब्लॅकमेलिंगमध्ये (Blackmail) गुंतलेले आहेत, याचे पुरावे देखील सादर केले असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

पंतप्रधान कार्यालयाकडे जे काही पुरावे (Evidence) दिले आहेत त्याबाबतचा अधिक तपशील शेअर करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद (Press conference) घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत (Sanjay Raut) आता नेमका काय खुलासा करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने (ED) केलेल्या कारवाईनंतर त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला मात्र त्यांच्या मुलाला ईडीने समन्स (ED summons) बजावलं आहे.

 

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) आत असताना आज मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली.
ईडीने कारवाई करताना प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची 13 कोटी 41 लाखांची संपत्ती जप्त केली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीला (NCP) आणखी एक धक्का बसला आहे.
त्यामुळे आता राऊत फासा पुन्हा फिरवणार?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | the game has started now press conference soon is sanjay rauts big announcement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, रिकव्हरी रेट 98 % , जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Russia-Ukraine War | वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात भारतीय मुले?, ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे

 

Maratha Reservation | मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेतलेले 15 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या