Sanjay Raut | संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले – ‘एकतर राज्यपाल राहतील नाही तर…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांकडून राज्यपालांना लक्ष्य केले जात आहे. त्यातच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या (MLAs appointed by Governor) रखडल्या आहेत. राज्यपालांनी अद्याप यावर कोणताच निर्णय घेतला नसल्याने राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष कमालीचे नाराज झाले आहेत. याच दरम्यान शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक विधान केले आहे. एकतर राज्यपाल राहतील नाहीतर विजय करंजकर (Vijay Karanjkar) आमदार होतील. मला खात्री आहे की विजय करंजकरच आमदार होतील, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, उत्तर महाराष्ट्र प्रवेशद्वार घोटीत शिवसेनेचा आमदार असता तर बरं वाटलं असतं. मात्र, यापुढे इथं शिवसेनेचा आमदार असेल. शिवसेनेच्या शाखेला आम्ही न्यायालय म्हणतो. घराघरातील भांडण शाखेत सोडवले जातात. विजय करंजकर यांची आमदारकी पाइपलाईनमध्ये आहे. राज्यपालांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून त्यांची आमदारकी रखडली, असे राऊत म्हणाले.

 

मुख्यमंत्री सावरकरवादी
माकड हा आपला पूर्वज आहे. सावरकर (Veer Savarkar), महात्मा गांधी (Mahatma Gandhi) कोणीही असेल. माकडाला आपण वंशज मानलचं पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी (CM Uddhav Thackeray) हे स्वत: सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तर सूर्याचं तेजचं त्याला जाळून टाकेल, अशा शबद्दात राऊत यांनी नितीन राऊत (Nitin Raut) यांना फटकारलं.

सावरकरांना विशिष्ट वर्गाने बदनाम केलं
मागील असंख्य वर्षात सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला.
परंतु ते महानायक राहतील, या देशातील विशिष्ट वर्गाने सावरकरांना कायम बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
सावरकरांचे देशातील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इतिहासातील पानांवरुन कोणाला पुसता येणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | the governor will remain or shiv sena will become mla say mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Men’s Health | पुरुषांनी पुरूषांनी ‘या’ 7 गोष्टींचं सेवन आवश्य करावं; टेस्टोस्टेरोन लेव्हल वाढल्याने सेक्स लाईफ चांगली, जाणून घ्या

Ajit Pawar | अजित पवारांनी जरंडेश्वर बाबतचे आरोप फेटाळले, ‘त्या’ 65 कारखान्यांची नावे केली जाहीर; किरीट सोमय्यांनाही दिलं ‘हे’ चॅलेंज

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,744 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी