संजय राऊत ही ‘सत्ता’ स्थापनेच्या प्रतिक्षेला कंटाळले ?, म्हणाले – ‘आता रोज रोज भेटणार नाही’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन दररोज वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे शिवसेनेला राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणे, पुढे जात आहे. त्यामुळे दररोज नवीन काय सांगायचे, असा प्रश्न संजय राऊत यांच्यासमोर पडला असावा, त्यामुळे दिल्लीत मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत ते आता रोज रोज भेटणार नाही, असे सांगून मोकळे झाले.

गेल्या १५ दिवसांपासून संजय राऊत मुंबईत दररोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत घेत होते. या पत्रकार परिषदेत ते दररोज ठामपणे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे सांगून भाजपावर हल्ला करुन त्यांना हैराण करुन सोडले होते. संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर ते सोमवारी दिल्लीत आले. आज सकाळी पत्रकार त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार निश्चितपणे येणार आहे.

शरद पवारांनी सरकारबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितल्यावर राऊत म्हणाले शरद पवार यांना समजावून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निश्चितच येणार असून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे. ती पूर्ण झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख स्वत: इतर नेत्यांच्यासमवेत त्याची घोषणा करतील.

आता दररोज भेटायची आवश्यकता नाही, असे सांगून ही पत्रकार परिषद संपविली. त्यामुळे महाशिव आघाडी प्रत्यक्षात येण्यास आणखी उशीर लागणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत का?. शिवाय आता त्यांना सांगण्यासारखे काही राहिले नाही. सत्ता स्थापनेला उशीर होणार असल्यानेच आता त्यांनी दररोज पत्रकारांना भेटणार नसल्याचे सांगितले का अशी चर्चा सुरु झाली आहे.

Visit : Policenama.com