सांगली : Sanjay Raut To Vishwajeet Kadam | विश्वजीत कदम आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या भावना आम्ही समजू शकतो. ते काँग्रेसचे (Congress) जुने कार्यकर्ते आहेत. मात्र, काही वर्षांपासून सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्या आहेत (Sangli Lok Sabha). विधानसभेला मिरजेत संघाचा (Miraj Vidhan Sabha) माणून निवडून येतो आणि दंगे घडवले जातात. गेल्या १० वर्षांपासून सांगलीत भाजपाचा खासदार निवडून येत आहे. त्यांचा सामना करायचा असेल, तर ठाकरे गटाचा उमेदवार (Shivsena UBT) निवडून येणे गरजेचे आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विश्वजीत कदमांची समजूत काढली आहे.(Sanjay Raut To Vishwajeet Kadam)
सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली होती. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे.
राऊत पुढे म्हणाले, आज जर जातीयवादी शक्तींचा समाना करायचा असेल, तर तिथे शिवसेना हवी आहे.
त्यामुळे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आणि आता काँग्रेस पक्षानेही आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली आहे.
पंतप्रधानपदी असेलल्या व्यक्तीने इतके खोटे बोलू नये. मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचे आहे.
त्यांना देशात विरोधक नकोत. त्यांना विधानसभा आणि लोकसभा विरोधीपक्षविना हवी आहे.
खरे तर पंतप्रधान मोदी यांची विचारसरणीच देशातील संविधानासाठी धोकादायक आहे.
राऊत पुढे म्हणाले, विरोधकांना तुरुंगात टाकायचे, त्यांच्यावर खोटे आरोप करायचे, त्यांना धमक्या देऊन आपल्या
पक्षात घ्यायचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. हाच देशातील संविधानाला सर्वात मोठा धोका आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा