Sanjay Raut | “उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर ….”; संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Sanjay Raut | आज मालेगाव (Malegaon) या ठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात? कोणावर टीका करतात ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याबाबतीतदेखील उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Sanjay Raut)
या सभेच्या अगोदर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. या मालेगावच्या सभेला सर्व जातीधर्मातील लोक येतील. हे संमिश्र असे शहर आहे. प्रत्येकाने या सभेला यावे. हा देश सगळ्यांचा आहे. या देशाची अखंडता, एकता कायम राहावी यासाठी शिवसेनेने (Shivsena) सदैव प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मालेगावच्या सभेला भाड्याने लोक येणार नाहीत. नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांच्या हुकुमशाहीविरोधात प्रत्येक विरोधी पक्षाने ठोस भूमिका घेतली पाहिजे असे आवाहनदेखील संजय राऊत यांनी विरोधकांना केले आहे.
तसेच या देशात लोकशाहीपद्धतीने आंदोलन होऊ देणार नसतील तर नरेंद्र मोदींनी राजघाटावरून लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झाली असे जाहीर करावे. राजघाट हे शांतताप्रिय आंदोलनासाठी ओळखले जाते. या ठिकाणच्या महात्मा गांधींच्या समाधीस्थळावरून या देशातील हुकुमशाहीविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली. त्यामुळे जर त्या ठिकाणी विरोधकांना जाऊ दिले नसेल तर या देशाचे भवितव्य कठीण आहे असा आरोपदेखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
या देशात पक्षांतर करणारे 16 आमदार अपात्र ठरत नाहीत. या देशात निवडणूक आयोग बेईमानांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देते.
पण राहुल गांधींना 24 तासांत अपात्र ठरवते. देशात 2 वेगवेगळे कायदे आहे.
भाजपा-बेईमानांसाठी वेगळा कायदा आणि आमच्यासारख्या लोकांसाठी वेगळा कायदा आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपात्र ठरवल्याशिवाय राहणार नाही असा दावादेखील संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर फाटली आहे
असे म्हणत मालेगावमध्ये उर्दू भाषेत लागलेल्या बॅनर्सचे समर्थन केले आहे.
Web Title :- Sanjay Raut | uddhav thackerays meeting in malegaon sanjay rauts criticism of bjp eknath shinde group
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस
Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत