राज्यात राजकीय भूकंप ? संजय राऊत पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तापेच वाढत चालला आहे. परंतू आता राज्यात काही रंजक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे आणि भाजपला धक्का तर राज्यात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण युतीचं फिसकटलं असं दिसत असताना आता काँग्रेसचे बडे नेते शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर पोहचले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत देखील शरद पवारांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. या घटनेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे हे उपस्थित आहेत. आता तेथेच संजय राऊत जाणार आहेत. यामुळे पुढे काय होणार याची चर्चा रंगली आहे. या भेटीत शिवसेनेला सत्ता स्थापनेस पाठिंबा देणार असल्याचा निर्णय होऊ शकतो.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच शरद पवारांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती, आता पुन्हा एकदा काही वेळाने काँग्रेसचे नेते शरद पवारांकडे जमल्यावर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता विरोधी बाकावर बसण्याचा जनतेने कौल दिलाय असे म्हणणारे विरोधक शिवेसेनेला पाठिंबा देऊन सत्तेच्या बाकावर बसणार की शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देणार यावर संभ्रम आहे.

Visit : Policenama.com