Sanjay Raut vs Chitra Wagh | शिवसेनेच्या बंडखोरांसाठी भाजपाच्या चित्रा वाघ सरसावल्या, राऊतांच्या आमदरांवरील टिकेला दिले उत्तर; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut vs Chitra Wagh | शिवसेनेतील बंडावर आतापर्यंत सावध भूमिका घेणारे भाजपा नेते आता उघडपणे शिवसेनेविरूद्ध (Shivsena) बोलू लागले आहेत. दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटातील वाद वाढत असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते आक्रमक झाल्याने शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) मदतीला भाजपा (BJP) सरसावल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांवर केलेल्या खळबळजनक वक्तव्यावर भाजपाच्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut vs Chitra Wagh)

 

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने दहिसर येथे एक मेळावा घेतला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोरांवर टिका करताना म्हटले की, ज्याने बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला. 40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील, त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. त्यावर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी राऊत यांना कम्पाऊंडर म्हणत टीका केली आहे. (Sanjay Raut vs Chitra Wagh)

 

संजय राऊत यांनी कोरोना काळात उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेताना डॉक्टर आणि कम्पाऊंडर यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. राऊत यांनी म्हटले होते की, मी आजारी पडलो की डॉक्टरपेक्षाही कम्पाऊंडरकडूनच औषधे घेतो. कारण कम्पाऊंडरला डॉक्टरपेक्षाही जास्त माहिती असते.

या वक्तव्यावरून राऊत यांच्यावर टीका झाली होती. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची कम्पाउंडर म्हणत खिल्ली उडवली होती. याच मुद्द्याचा आधार घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राऊत यांना आता कंपाऊंडर म्हटले आहे. कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये रवानगी करण्याची वेळ आली आहे, असे भाजपाच्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

 

दहिसर येथील शिवसेना मेळाव्या खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला.
40 जणांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही.
माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही. गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचे घर.
पण महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत.
बंडखोरी हे मी संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ.

राऊत पुढे म्हणाले की, आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावे लागेल.
40 आमदारांचे आत्मे कधीच मेले आहेत, आता गुवाहाटीतून केवळ मृतदेह येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू.
कामाख्या देवीसाठी 40 रेडे पाठवले आहेत. बळी द्या.

 

Web Title :- Sanjay Raut vs Chitra Wagh | CM uddhav thackeray led shivsena
mp sanjay raut slammed by devendra fadnavis led bjp chitra wagh over doctor compounder 40 dead bodies remark

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा