Sanjay Raut । भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत भडकले, म्हणाले..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut । भाजपाच्या (BJP) राज्य कार्यकारिणीत सीबीआयचा (CBI) ठराव झाला त्याचं आश्चर्य वाटतं. त्यांनी सीबीआय आणि ईडी हे त्यांच्या पक्षाचे सदस्य आहेत असं त्यांना वाटत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही सांगू तसंच केलं जाईल असं त्यांना वाटत असेल. पण यामध्ये सर्वात जास्त अवमूल्यन सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं होत आहे हे स्पष्ट दिसत आहे.

असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पोलीस दलातून बर्खास्त केलेले सचिन वाझे यांच्या लेटरमधील आरोपांप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचीही CBI चौकशी व्हावी अशी मागणी कालच भाजपच्या (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर केला गेला. या मुद्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत (Sanjay Raut) हे मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘अनिल परब (Anil Parab) असतील अथवा अजित पवार यांच्या संदर्भात काही आरोप असतील तर महाराष्ट्रातील तपास यंत्रणा त्या आरोपांची चौकशी करण्यात सक्षम आहे, न्यायालये आहेत. एखादा तपास सीआयएने वैगेरे करावा असे ठराव करा. किंवा मग आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची भाषा करा. आता हेच बाकी आहे, असा निशाणा राऊत (Sanjay Raut) यांनी साधला आहे. पुढे म्हणाले, “सरकारला दोन वर्ष होत आली असून यापुढील दोन वर्षही उद्धव ठाकरें यांचंच सरकार चांगल्या पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करून कोणाला महाराष्ट्रात आपलं सरकार येईल असं कोणाला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत, अशी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय.

पुढे राऊत म्हणाले, ‘जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ED आणि CBI साठी अयोध्येतील महापौर उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेला जमिनीचा व्यवहार अत्यंत योग्य प्रकरण आहे.
तिथे देखील या केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं आवश्यक आहे.
आणि फक्त महाराष्ट्राच्याच कार्यकारिणीने कशाला तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने अयोध्येत जो जमीन घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
त्याचा ED आणि CBI कडून तपास करावा, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

ED आणि CBI ची बदनामी –

ED अथवा CBI शी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. त्या राष्ट्रीय संस्था आहेत.
जर देशाचं नुकसान होणारी घटना असेल, मनी लाँड्रिंग असेल तर नक्कीच CBI आणि ED ने तपास केला पाहिजे.
मात्र, आज ज्या प्रकारची प्रकरणं त्यांच्याकडे दिली जात आहेत त्यावरून हे राजकीय वाटत आहे.
ED आणि CBI ची बदनामी केली जाते असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Sanjay Raut was outraged by the demand of cbi enquiry resolution regarding Ajit Pawar in the BJP executive meeting, he said

हे देखील वाचा

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’