Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. त्यावर भूमिका घेण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील बसवराज बोम्मई पुन:पुन्हा हा वाद उकरून काढून महाराष्ट्राला डिवचत आहे. त्यामुळे त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशीच दिसतेय की, आमचे ते आमचेच आणि तुमचे तेही आमच्या बापाचे, मग आमचे मुख्यमंत्री काय करताहेत, हा आमच्यापुढचा मोठा प्रश्न आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेव मुख्यमंत्री आहेत, की त्यांनी आत्तापर्यंत यावर तोंड उघडलेले नाही. त्यांच्या गटाची निशाणी ढाल-तलवार नसून कुलूप असायला हवी होती. त्याची चावी दिल्लीकडे आहे. दिल्लीवाले जेव्हा कुलूप उघडतील, तेव्हा हे बोलतील. पण त्यांच्यात बोलण्याची हिंमतच नाही. शुक्रवारी सुप्रिया सुळेंनी जोरदार भूमिका मांडली. तेव्हा हे सगळे कुठे होते? महाराष्ट्राचा अपमान करावा यासाठीच हे षडयंत्र आहे.
अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उठून उभे राहायला हवे. पण ते गायब आहेत.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशीच दिसत आहे. आमचे ते आमचे आणि तुमचे तेही आमच्या बापाचे, असे त्यांना सांगायचे आहे.
पण, आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? त्यांची यावर भूमिका काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात याच्याशी महाराष्ट्राला काही पडले नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईंना कशाप्रकारे उत्तर देतात हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री या लढाईत उतरले आहेत की नाहीत? ते कुठे आहेत? असे संजय राऊत यांनी विचारले. (Sanjay Raut)

बोम्मई यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राल डिवचले आहे.
महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही.
महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न अनेकदा केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे.
आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही,” असे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले आहे.

 

Web Title :- Sanjay Raut ‘We don’t have to let the Chief Minister of Karnataka say anything; When will our Chief Minister open his mouth?’ – Sanjay Raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Zee Marathi | झी मराठीवरील ‘हा’ शो घेणार प्रेक्षकांचा निरोप ; तर ‘या’ नवीन दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Chandrakant Patil | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

Malaika Arora | अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावले खडे बोल; म्हणाली “तो मर्द आहे…”