Sanjay Raut | ‘राज्यपाल, हे काय सुरु आहे?’, संजय राऊतांनी दाखवली राज्यघटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेले निर्णय बदलण्याचे काम सुरु केले आहे. आरे मेट्रो कारशेड (Aarey Metro Carshed), इंधन कर कपात (Fuel Tax Reduction) ते आज घेतलेला औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा निर्णय घेण्यात आला. यावर शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच राज्यघटनेचा (Constitution) हवाला देत थेट राज्यपालांना (Governor) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रश्न विचारला आहे.

 

भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ (Cabinet) असणे बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडले आहे. राज्यपाल हे काय सुरु आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

 

 

संजय राऊतांचे ट्विट
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल, हे काय सुरु आहे?

 

संजय राऊत यांनी भारतीय राज्यघटनेच्या 66 व्या पानावरील कलम 164 1A चा फोटो पोस्ट केला आहे.
यामध्ये मंत्रिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धरुन विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त 15 टक्केच मंत्री असू शकतात असे म्हटले आहे.
तसेच कमीत कमी ही संख्या 12 असू शकते. परंतू शिंदे सरकारने अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) केलेला नाही.
यामुळे शिंदे आणि फडणवीस हे दोघेच निर्णय घेत आहेत. यावर राऊत यांनी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | whats going on governor sanjay raut objected to the cabinet of two ministers eknath shinde devendra fadanvis descisions what indian constitution says

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde-Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी चालू पत्रकार परिषदेत केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, व्हायरल झाला व्हिडीओ

 

Pune Crime | हॉटेल बॉटल फॉरेस्ट, हॉटेल ब्ल्यु शॅक मधील अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, 10 जणांवर FIR

 

Pune Pimpri Crime | कॅनडा विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक