Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीतील तीन भिन्न पक्षांनी एकत्र येत सरकार चालवलं. तोच समन्वय आणि एकोपा हा विरोधी पक्षात काम करत असताना हवा. असे मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. आणि जो गोंधळ नाशिक पदवीधर मतदार संघात झालायं त्याकडे देखील महाविकास आघाडी म्हणूनच पाहण्यात यायला हवं. असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीवर भाष्य करताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, मी कोणालाही दोष देत नाही, पण सध्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असे दिसत आहे. राज्यात विरोधी पक्षात काम करत असताना समन्वय असायला पाहिजे. नागपूर आणि नाशिकच्या जागेसाठी चर्चा व्हायला हवी होती. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, जर भविष्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत. असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या गोंधळाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘तांबे कुटुंब हे निष्ठावान आहेत.
पूर्वापार ते काँग्रेसशीच संबंधित आहेत. मात्र नंतर सत्यजित तांबेंनी काय निर्णय घेतला हे जर आम्हाला माहित नसेल काँग्रेसला माहित नसेल तर काय करता येईल? तांबे कुटुंब आणि गांधी घराण्याचे संबंध चांगले आहेत.
सत्यजित तांबे यांनी जी चूक केली आहे ती त्यांची चूक आहे. त्याकडे काँग्रेसची चूक म्हणून पाहता येणार नाही.
जे काही नाशिकमध्ये घडलं आहे ते घडायला नको होतं. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे.
नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही. असे देखील यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, नुकतच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्वीटरवरून भारत जोडो यात्रेत
सहभागी होण्याविषयीचा आशय लिहिला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,
‘मी जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. मी रोज भारत जोडो यात्रेची माहिती घेतो आहे.
त्यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मी आत्ता निवडणुकांविषयी बोलणार नाही.
पण भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या यात्रेमुळे जागरुकता निर्माण होते आहे.
असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना माध्यमांना सांगितलं.

Web Title :-Sanjay Raut | while working together in the opposition party there should be coordination in mva sanjay raut big statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Accident News | महाबळेश्वरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात

Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

Pune Crime News | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; मुंढवा येथील खळबळजनक घटना