संजय राऊत यांच्यावर पुन्हा अ‍ँजिओप्लास्टी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये उद्या ही शस्त्रक्रिया होणार असून, त्यासाठी आज सायंकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये ते दाखल होणार आहेत. प्रख्यात डॉ़. सॅम्युअल मॅथ्थू हे अँजिओप्लास्टी करणार आहेत.

गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना अचानक संजय राऊत यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.

You might also like