Sanjay Raut | ‘या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?’; रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev) यांचा ठाण्यात कार्यक्रम झाला. त्यांनी तिथे योग विज्ञान शिबिर घेतले, त्यानंतर महिलांचा योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या योग शिबिरानंतर लगेच महिला महासंमेलन पार पडले. महिलांनी या कार्यक्रमात येताना योगासाठी ड्रेस आणि महासंमेलानासाठी साड्या आणल्या होत्या. पण योग्य प्रशिक्षणानंतर लगेच महासंमेलन सुरु झाल्याने महिलांना त्यांनी आणलेल्या साड्या घालायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे महिला थोड्या नाराज होत्या. तेव्हा बाबा रामदेव म्हणाले, ‘महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी त्यांचा निषेध केला. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाबा रामदेव यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रश्न केला आहे.

बाबा रामदेव यांच्या विधानावर संजय राऊतांनी टीका (Sanjay Raut) केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ” जेव्हा रामदेव बाबांनी असं लज्जास्पद विधान केलं तेव्हा तिथे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी उपस्थित असल्याचं मला कळलं. अशा विधानानंतर आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कुणीही कितीही मोठा असला तरी त्याच्या कानाखाली सणसणीत द्यायला पाहिजे”, असा प्रश्न त्यांनी अमृता फडणवीसांना केला आहे.

“तुम्ही एका बाजूला महिलांच्या रक्षणाच्या, सबलीकरणाच्या गोष्टी करता, त्यासाठी कायदे बनवता,
सर्वांना ज्ञान पाजळता. त्याचवेळी असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो.
राज्यपालांच्या विधानावर सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सरकारने तोंड शिवलंय. आता भाजपचे महाप्रचारक रामदेव बाबा महिलांविषयी असे अभद्र उच्चार काढतात, तरी सरकार गप्प बसलंय. मला फक्त हे पाहायचाय की, या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर लक्ष्य केले.

Web Title :- Sanjay Raut | yogguru ramdev baba controversial statement sanjay raut slams amruta devendra fadnavis eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील