‘ते’ सगळं आधीच ठरलं होतं, संजय राऊतांनी केला मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला धक्का देत जसं घाई-घाईत राज्यात भाजप सरकार स्थापन झालं, तसंच आज पुन्हा एकदा घाई-घाईत भाजप सरकार कोसळलं. या दरम्यान चर्चा होती ती हे सर्व शरद पवारांनीच घडवून आणलंय की काय. या मागे शरद पवारांचाच हात होता असे बोलले जाऊ लागले आहे. त्यानंतर जे काही नाट्य घडलं ते सर्वांनीच पाहिलं. परंतू आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी द्यायचे ते संकेत दिलेच.

संजय राऊत यावेळी म्हणाले की सगळं आधीच ठरलं होतं, अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या. या सर्वाचे स्क्रिप रायटर कोण होतं हे तुम्हाला लवकरच कळेल. यामुळे आता भाजपला शरद पवारांनी आपले फासे टाकत मोदी, शाहांच्या राजकारणाला शह दिलाय का असा सवाल उपस्थित झाला होता. संजय राऊत म्हणाले की मी आधीच सांगितलं होतं की शरद पवारांनी समजून घ्यायला भाजपला 100 जन्म घ्यावे लागतील. संजय राऊतांच्या या संकेतामुळे आता शंका उपस्थित केली जात आहे की या सर्वामागे शरद पवारचं नव्हते ना?

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता हा सत्तास्थापनेच्या या स्क्रिप्टचे रायटर शरद पवारच होते का यासंबधित साशंकता निर्माण झाली. एकीकडे अजित पवारांनी थेट भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर रात्रीत भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन झालं. फडणवीस, अजित पवार यांनी क्रमश मुख्यमंत्रिपदाची आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतू गेम फिरत गेला. अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. अजित पवारांनी राजीनामा दिला.  त्यानंतर 80 तासाचे सरकार देखील पडले आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Visit : Policenama.com