पवारांनी तर ममता, चंद्राबाबू आणि मायावती यांची खिल्ली उडवली : संजय राऊत

नाशिक: पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवारी पार पडणार आहे. पंतप्रधान पदासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जात आहे तर महाआघाडीकडून पंतप्रधान पदासाठी ममता, चंद्राबाबू, मायावती यांची नावं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती. त्यावरून भाजप कडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पवारांच्या या वक्तव्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे कुणीच पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत असे सांगत पवारांनी तर ममता, चंद्राबाबू आणि मायावती यांची खिल्ली उडवली आहे. असे म्हणत महाघाडीचा पराभव निश्चित ” असल्याची टीका केली आहे.

याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ” पवारांनी ज्यांची नावे पंतप्रधान पदासाठी घेतली त्यांची आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये अवस्था वाईट आहे. त्यामुळे पतप्रधान पदासाठी त्यांची नावं घेऊन पवारांनी खिल्ली उडवली आहे. ज्याअर्थी पवारांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले नाही याचा अर्थ युपीएचा पराभव होणार हे निश्चितपणे पवारांनी दिसले आहे.

पंतप्रधानांची जात काढणे वाईटच

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी आणि पवारांची एकही एकत्र सभा झाली नाही हे गंभीर असल्याचे राऊत म्हणाले. तसेच त्यांनी पंतप्रधानाची जात काढणे वाईटच असल्याचे ते सांगितले. पंतप्रधानाला जात नसते. देशात कोणतही सरकार असो देशाचे पैसे लुटणाऱ्यांना देशात आणून त्यांचे पैसे जनतेला द्यावेत, असे देखील राऊत म्हणाले.

नक्की काय म्हणाले होते पवार

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी केला आहे.