संभाजी भिडेंच्या सांगली ‘बंद’ला संजय राऊतांनी दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांनी उद्या सांगली बंदचं आव्हान केलं आहे. याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली तेव्हा बंद का नाही केला असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांच्या विधानाचा निषेध करताना संभाजी भिडे म्हणाले, “संजय राऊत यांचं वक्तव्य अपमानास्पद आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी देशाचाच नाही तर छत्रपतींच्या परंपेरचा अपमान केला आहे. यामुळे उद्या (दि. 17 जानेवारी) सांगली जिल्हा बंद असेल. संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. उदयनराजेंचा अपमान करणाऱ्या आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदावरून हटवावं. अन्यथा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही असाच बंद केला जाईल.” असा इशाराही त्यांनी दिला.

शिवप्रतिष्ठान ही संघटना नेहमीच उदयनराजेंच्या मागे असते. यावेळीही या संघटनेचा उदयनराजेंना पाठिंबा आहे. संभाजी भिडे यांनी सांगली बंदचं आव्हान केलं आहे. विशष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्याच सांगली दौऱ्यावर असणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like