‘हमको तो तलाश नये रास्तों की है…’; संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सचिन वाझेंना सांगितले होते तसे पूर्वे आपल्याकडे असल्याचे सिंग यांनी म्हंटल आहे. सिंग यांच्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकारावरून सरकारला धरेवर धरलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हि अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना असलीच म्हंटल आहे दरम्यान शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र रविवारी सकाळी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून अंदाजे बयाँ.. अशारितीने सर्वांनाच संभ्रमात टाकलंय.

ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, पोलीस दलात काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. नुकतेच परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. डीजी दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेले इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोपांमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहे. ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत अमृता फडणवीस यांनीही ट्विट केलंय. भाजपनेत्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना शनिवारी रात्री या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मला याबाबत माहिती नाही, या आरोपांची मला कल्पना नाही. त्यामुळे, मला सध्या काहीही बोलायचं नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, रविवारी सकाळी राऊत यांनी नेहमीप्रमाणे ट्विट करत शायरीतून अंदाजे बयाँ.. अशारितीने सर्वांनाच संभ्रमात टाकलंय.

हमको तो तलाश बस नये
रास्तों की है
हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से
आए है…

असे ट्विट राऊत त्यांनी केल्याने राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर, प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार या शायराना ट्विटचा अर्थ घेत आहे.

अमृता फडणवीस यांचीही टीका
वाझे प्रकरणात अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “व्यवहार माझे, जबाबदार वाझे!, सांगा पाहू कोणकोणास म्हणाले”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर, परमबीरसिंग यांच्या पत्राचे वृत्त माध्यमांत झळकताच अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय..

बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?,

असे ट्विट अमृता यांनी केलंय. मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांच्याकडे अमृता यांच्या ट्विटचा रोख असल्याचं दिसून येतंय.

जयंत पाटील म्हणतात…
सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या संदर्भात बोलताना म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या तपासाबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांचे पत्र म्हणजे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. कोणाची तरी सहानुभूती मिळवून हे दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ,