Sanjay Shirsat | सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ विधानावरून संजय शिरसाटांचा टोला! म्हणाले – ‘कुणीतरी माझी काळजी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत (BJP)सरकार स्थापन केले असले तरी त्यांच्या गटातील काही आमदार नाराज असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यापैकीच एक नाव आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे घेतले जाते. आता तर काही नाराज आणि अस्वस्थ आमदार पुन्हा शिवसेनेत येणार असल्याचा दावा शिवसेनेकडून (Shivsena) केला जातोय. याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मात्र यावर खुद्द संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीच स्पष्टीकरण देत सुषमा अंधारे यांना खोचक टोला लगावला आहे.

 

सुषमा आंधारे म्हणाल्या होत्या की, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली नाही. उलट संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar), अतुल सावे (Atul Save) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) अशा तिनही लोकांना मंत्रीपद मिळाल्यामुळे संजय शिरसाट यांची मंत्रीपदाची आशा मावळली आहे. त्यामुळे आता सगळ्याच जास्त पश्चात्ताप संजय शिरसाट यांना होत आहे.

यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देत सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, आमच्या ताई सुषमा अंधारेंनी भावाबद्दल चांगले वक्तव्य केले त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कुणीतरी माझी काळजी करणारे आहे हे ऐकून मला बरे वाटले. पण अशी कोणतीही नाराजी माझ्यात नाही. मी नाराज नाही. याबाबत अनेक वेळा मी बोललोय. सध्या माझ्या नाराजीचं काही कारणच नाही.

 

मंत्रीपदाविषयी सूचक विधान करताना संजय शिरसाट म्हणाले, मी वेटिंगवर आहे म्हणजे काय? एखाद्या मंत्रीमंडळाचा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो, तेव्हा योग्य वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तो निर्णय घेत असतात.

 

Web Title :- Sanjay Shirsat | cm eknath shinde group sanjay shirsat mocks shivsena sushma andhare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या