Sanjay Shirsat | ‘सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांचा डोंबाऱ्याचा खेळ;’ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलयं, त्यांचा अहंकार एवढा वाढलाय, आमदार गेले, सत्ता गेली, पक्ष संपत चालला तरी अहंकार संपत नाही. अहंकार वाढण्यामागे जी भूमिका आहे ती संजय राऊत पेट्रोल टाकून वटवतायेत. असा घणाघात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटावर केला. तर आदित्य ठाकरे यांच्या विधानाला जास्त महत्व देण्याचे कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरूवात ही दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेवून चढलेली पायरी होती. अशा शब्दात यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली.

यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘वरळी हा त्यांचा मतदारसंघ नाही. सचिन अहिर (Sachin Ahir), सुनिल शिंदे (Sunil Shinde) यांच्या छाताडावर पाय ठेवून ते पायरी चढले आहेत. हे ते आता विसरले आहेत. आणि म्हणुनच त्यांच्या आव्हानाला महत्व देण्याचे कारण नाही. राजकारणात निवडणुक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकले असे आदित्य ठाकरे यांना वाटते. आम्ही देखील अनेक निवडणुका जिंकल्या पण आमच्यात हा अहंकार आला नाही.’ असं यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले.

तर, सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या सभा होत आहेत त्यावर देखील त्यांनी भाष्य केले. ठाकरे गटाच्या ज्या सभा होत आहेत तो डोंबाऱ्याचा खेळ आहे. फक्त त्या रस्सीवरचे पात्र बदलतात. कधी, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), कधी सुषमा अंधारे (Sushma Andhare), तर कधी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), रस्सीवर उड्या मारतात आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या तर आपल्याला फार दाद देतात, असे त्यांना वाटते. हे काही दिवस चालणारे नाटक आहे. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते गप्प बसतील. असा खोचक टोला देखील यावेळी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाला लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडी राहणार नाही. काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.
आघाडी कशी चालेल हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) पाहतील.
संजय राऊत (Sanjay Raut) यांचे फॉर्मुले चालत नाहीत.
त्याला शिवसेना फोडायची होती, त्यात राऊताला यश आले.
अशा एकेरी भाषेत यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
तर भविष्यात कोणतीही आघाडी राहणार नाही. सगळे स्वतंत्र लढतील आणि सत्ता आमचीच राहील.
असा आत्मविश्वास देखील यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

Web Title :- Sanjay Shirsat | mla sanjay shirsat criticized aditya thackeray bhaskar jadhav sushma andhare

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग, सराईत गुन्हेगार FIR; कोंढवा परिसरातील घटना

Nitin Deshmukh | ठाकरे गटाच्या आमदाराने राणे समर्थकाला दिलेला शब्द पाळला; सांगितल्याप्रमाणे नितीन पाटील नरीमन पॉईंटवर आले अन्…

Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती