मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Shirsat | मुंबईत काल सकल हिंदू संघटनेकडून जनआक्रोश मोर्चाचे (Jan Akrosh Morcha) आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा दादर येथून सुरू होवून प्रभादेवीला समाप्त करण्यात आला. यावेळी हा मोर्चा शिवसेना भवन (Shivsena Bhawan) परिसरातून पुढे गेला. त्यावरून एक फोटो ट्वीट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच संजय राऊत यांनी या मोर्चावर माध्यमांसमोर देखील प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Sanjay Shirsat)
मुंबईमध्ये काल झालेल्या मोर्चाबाबत ‘सामना’ च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी मोर्चात सहभागी झालेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच आज सामना च्या मुखपृष्ठावर प्रथम राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) बातमी दिली आहे. तर त्याच्या खाली जनआक्रोश मोर्चाची बातमी देण्यात आली आहे. त्यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे.
यावेळी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, ‘मी वारंवार सांगत आलोय की संजय राऊत हा वेडा माणूस आहे. आजच्या घडीला संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे. तो नेमकं काय करतोय हे त्याला सुद्धा कळत नाही. संजय राऊत हा असा व्यक्ती आहे की राहुल गांधींचा फोटो आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो हा शिवसेना भवनात लावायला कमी करणार नाही.’ अशी एकेरी शब्दात टीका यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘सर्वधर्म समभावाची व्याख्या त्याला पाठ झालेली आहे. ज्याचा विरोध शिवसेना प्रमुखांनी केला होता, जे गाडलेले मुडदे आहेत त्यांना जिवंत करण्याचं काम संजय राऊत करतो आहे. म्हणून संजय राऊतला आणखी हिंदुत्व कळायला फार अवकाश आहे. शिवसेना संपली असं समजूनच तो अशी विधानं करत आहे. आता कदाचित शेवट काय करायचा आहे, या विवंचनेत तो सुद्धा आहे.’ अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
तर पदवीधर निवडणुकीवर देखील यावेळी संजय शिरसाट यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, ‘या निवडणुकीचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल,
की महाविकास आघाडी जरी झाली तरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपने जी रणनीती आखलेली आहे,
त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. अनेक ठिकाणचा पराभव त्यांनी (महाविकास आघाडीने) मान्य केलेला आहे.
या पराभवास आता कसं पचवावं या विवंचनेत ते आहेत.’ असा टोला देखील यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.
Web Title :- Sanjay Shirsat On Sanjay Raut | shinde mla sanjay shirsat criticizes shiv sena mp sanjay raut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश
Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)