Sanjay Shirsat | …तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते, संजय शिरसाट यांचे खळबळजनक विधान

छ.संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. आज जयंत पाटील हे चौकशीसाठी ईडी (Jayant Patil ED Inquiry) कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत भाजप (BJP) आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावर बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, ईडीचा वापर केला असता तर अनेक लोक तुरुंगात भेटले असते. ईडी आमच्या इच्छेप्रमाणे वागली असती तर आता संजय राऊत हे अंडासेलमध्ये असते, असे शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, ईडीची नोटीस हा काही नवीन भाग नाही, राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील नोटीस आली आहे. ते नोटीसला उत्तर देण्यासाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. परंतु आाता शक्तीप्रदर्शन करण्याचा नवा पॅटर्न असल्याचे सांगत त्यांनी जयंत पाटलांना टोला लगावला. यावेळी शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ईडीचा वापर केला असता तर अनेक लोक तुरुंगात भेटले असते. ईडी आमच्या इच्छेप्रमाणे वागली असती तर आता संजय राऊत हे अंडासेलमध्ये असते, असे शिरसाट म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांचे नागपूरमध्ये
भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. यावरुन संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा
साधला आहे. आनंदाची बाब आहे, कोणतरी भावी मुख्यमंत्री म्हणतंय. बॅनर लावल्यानं जर मुख्यमंत्री बनता आलं असतं तर मी माझे बॅनर सर्व शहरात लावले असते, असं संजय शिरसाट म्हणाले.

Web Title : Sanjay Shirsat | sanjay shirsat once again criticizes sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | Wanwadi Police Station : वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या, 10 वाहने हस्तगत

Pune High Temperature News | पुणेकरांना उन्हाच्या धारा सोसवेनात! येत्या आठवड्यातही पारा होणार 40 च्या पार

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष’, माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितले