Sanjay Shirsat | पवारांसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची आव्हाडांना मूकसंमती, ‘त्या’ वक्तव्यावर शिरसाट यांचा आरोप

मुंबई : Sanjay Shirsat | जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्याला सरळ अर्थाने घेऊ नका. शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर बोलतात तेव्हा ती शरद पवारांची भूमिका असते. शरद पवारांनी ते जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून वदवून घेतले असावे, असा आरोप शिंदे गटाचे (Shinde Group) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. श्रीराम मांसाहारी (Lord Ram Non Vegetarian) होते, असे वक्तव्य आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात बोलताना केले होते. यावेळी पक्ष अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) देखील उपस्थित होते. आव्हाडांच्या वक्तव्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

आव्हाडांच्या या वक्तव्याबाबत संजय शिरसाट म्हणाले, आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर ते चुकीचे बोलले, असे शरद पवार कुठेही म्हणाले नाहीत. याचा अर्थ त्यांची याला मूकसंमती आहे. आपलेच लोक आपल्या देवावर असे विधान करतात, हे वाईट आहे. दुसऱ्या धर्मातील दैवताबद्दल आव्हाड बोलले असते तर त्यांचे कपडे आतापर्यंत फाडले गेले असते.

शिरसाट पुढे म्हणाले, आव्हाड स्वतःच्या राजकारणासाठी, मते कशी मिळतील, याचाच विचार करत असतात. त्यातून त्यांनी हे विधान केल्याचे दिसते. राम मंदिराच्या उदघाटनानिमित्त संबंध देशभर उत्साहाचे वातावरण असताना असे विधान करून हिंदू धर्मीयांच्या भावनांवर मीठ चोळले.

आव्हाडांनी वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केल्यासंबंधी शिरसाट म्हणाले, पक्षाच्या मंचावर बोलल्यानंतर ती पक्षाचीच
भूमिका असते. मी संजय शिरसाट म्हणून पत्रकार परिषद घेत असताना मी पक्षाचीच भूमिका मांडत आहे.
कुणालाही शिवी द्यायची आणि मग खेद व्यक्त करायचा, ही कुठली पद्धत आहे. गांधीजी ओबीसी होते का? तीन वेळा
त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, हे तुम्हाला कुणी विचारायला आले होते का?

शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, राम वनवासात काय खात होते? याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे.
या विषयावर दहाचा भोंगा बोंबलताना आज दिसला नाही.
म्हणजे याच्यावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्व नेत्यांची मूकसंमती आहे.
आव्हाड यांना आम्ही किंमत देतच नाही, पण इतर मोठ्या नेत्यांनी त्यांच्या तोंडी हे भरविले, हे निश्चित सांगतो.

ठाकरे गटावर (Thackeray Group) टीका करताना संजय शिरसाट म्हणाले, आमच्याकडे हिंदुत्वाचा वारसा आहे,
असे म्हणणाऱ्या लोकांनी आतापर्यंत एकही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मतांसाठी लाचारी करणाऱ्या या मंडळींना जनता आगामी निवडणुकीत निश्चितच धडा शिकवेल.
हिंदूच्या भावना भडकविण्याचा, देवदेवतांचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम भोगावे लागतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दुचाकीच्या चाकावरुन आरोपीला अटक, महाळुंगे पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 29 लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांना पैसे देण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक, कोंढवा परिसरातील प्रकार

Nashik Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तलवारीसह नाशिक पोलिसांकडून अटक, 8 महिन्यांपासून होता फरार