Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास ठाकरे गटाकडून (Thackeray Group) व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे (Shinde Group) नेते संजय शिरासाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे 15 आमदार अपात्र ठरतील असे सांगितले आहे. आम्हाला जर अध्यक्षांनी पात्र केलं तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील असे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, पक्ष कोणाचा आहे की, पक्ष कोणाचा किंवा चिन्ह कोणाचं यावर सखोल अभ्यास करुन निर्णय घ्यावा. प्रतोदांबद्दलच्या निर्णयाबद्दल बोलायचं झाले तर अध्यक्ष त्यावर सुनावणी घेतील. त्यानंतर ठरेल की, पक्ष प्रतोद नेमका कोण असेल. हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. कोर्टाने म्हटलं की त्याबाबतची फक्त प्रक्रिया चुकली आहे.
शिरसाट पुढे म्हणाले, 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नसल्याने विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवलं आहे. मात्र, ठाकरे गटात जे शिल्लक आमदार आहेत ते कुठे जाऊ नयेत यासाठी त्यांचा सगळा खटाटोप सुरु आहे.
आम्ही काहीही चुकीचं केलंच नाही.
त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला पात्र ठरवले तर त्यांच्याकडे असलेले 14-15 आमदार त्यांना अपात्र ठरवावं लागेल.
कारण पक्ष आमच्याकडे आहे, चिन्ह आमच्याकडे, अधिकारी आमच्याकडे आहेत.
मग हे तिथे कसे राहू शकतात, त्यांना आमचा व्हीप लागू शकतो.
आमचा व्हीप मान्य केला नाही तर ते अपात्र ठरू शकतात, असा तर्क संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
Web Title :- sanjay shirsat says thackeray group 15 mlas can be disqualified
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत