IIF पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी संजय वाघुळदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन्स असोसिएशनच्या (आयआयएफ) पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी संजय वाघुळदे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी राजेंद्र नेवाडकर , मानद सचिवपदी आर. डी. धुमाळ तर खजिनदार पदी मानसी कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झालेले श्री. वाघुळदे हे पुण्यातील व्ही- स्मार्ट थर्मोटेक प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत.आयआयएफचे देशात 28 चॅप्टर आहेत. पुणे चॅप्टरमध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच नगर, नाशिक, औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. फाऊंड्रीजच्या हितांचे रक्षण आणि फौंड्रीमेन्सच्या विविध प्रशनांची सोडवणूक यासाठी असोसिएशन कार्यरत आहे. फौंड्रीच्या क्षेत्रात होत असलेले नवे बदल, नव्या कार्यपद्धती सर्व सदस्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन असोसिएशनच्या वतीने करण्यात येते.