संजय दत्तची 3 री बायको ‘ही’ अभिनेत्री, एकेकाळी करत होती C-Grade चित्रपटांमध्ये काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने २२ जुलैला आपला ४० वा बर्थडे साजरा केला. मान्यताचा जन्म २२ जुलै १९७९ ला मुंबईमध्ये मुस्लिम परिवारात झाला. मान्यताचे लहानपणीचे नाव दिलनवाज शेख होते. तिचे बालपण दुबईमध्ये गेले पण बॉलिवूडमध्ये आल्यानंतर मान्यताने आपले नाव बदलून सारा खान ठेवले. नंतर चित्रपटसृष्टीमध्ये ती याच नावाने प्रसिद्ध झाली. प्रकाश झा यांचा चित्रपट ‘गंगाजल’ मध्ये तिचा आयटम सॉंग खूप लोकप्रिय झाला होता. या आयटम सॉंग नंतर प्रकाश झा यांनी तिला मान्यता नाव दिले. संजय दत्तसोबत लग्न होण्याआधी पहिले मान्यता सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करत होती.

मान्यताने २००८ मध्ये संजय दत्तसोबत लग्न केले होते. लग्नानंतर मान्यताने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. मान्यता सध्या संजय दत्तची प्रोडक्शन कंपनी ‘संजय दत्त प्रोडक्शन’ ची सीईओ आहे. या व्यतिरिक्त मान्यता संजय दत्तचे सगळे काम पाहते. मान्यताचे वडिल दुबईचे प्रसिद्ध बिजनेसमॅन होते पण तिच्या वडिलांच्या निधनानंतर मान्यताने चित्रपट सोडून परिवारावर फोकस करणे सुरु केले होते.

मान्यताला एक मोठी अभिनेत्री बनायची इच्छा होती. पण तिला मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. अशामध्ये तिने सी ग्रेडमध्ये काम करुन समाधान मानले. संजय दत्तने २० लाखामध्ये मान्यताचे एक सी ग्रेड चित्रपटाचे राईट्स खरेदी केले होते. या मिटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्यावेळी संजय दत्त ज्युनियर आर्टिस नाडिया दुरानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा नाडिया शहराच्या बाहेर जायची तेव्हा संजय दत्त मान्यतासोबत वेळ घालवित असे. यानंतर त्यांची जवळीक जास्त वाढली आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले.

२००८ मध्ये संजय आणि मान्यताने लग्न केले. मनोरंजक गोष्ट ही आहे की, लग्नाच्या वेळी संजय ५० वर्षाचा होता आणि मान्यता २९ वर्षाची. वयामध्ये खूप अंतर असल्यामुळे परिवाराकडून खूप विरोध झाला होता. तरी देखील त्यांनी लग्न केले. मान्यताला शहरान आणि इकरा अशी दोन मुले आहे.