‘हे’ आहेत राज्यातील सर्वात श्रीमंत (IPS) अधिकारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा राज्यात सर्वात श्रीमंत आयपीएस अधिकारी असल्याचं समोर आलं आहे. तर त्यांच्या पाठोपाठ परमबीर सिंग यांचा क्रमांक लागतो. तर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे अव्वल ठरले आहेत. केंद्राकडे आपल्या संपत्ती व मालमत्तेबाबत सादर केलेल्या विवरण पत्रांमधून ही बाब समोर आली आहे.

 

सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता असावी यासाठी भारतीय प्रशासकिय सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना आपल्या मालमत्ता आणि संपत्तीचा तपशील देणे बंधनकारक आहे. दरवर्षी अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता व संपत्ती जाहीर करावी लागते. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांनीही संपत्तीचे विवरण दिले आहे. केंद्राकडे दिलेले हे विवरण कार्मिक व प्रशासन विभाग म्हणजे डीओपीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.

२०१८-१९ चा तपशील जाहीर करण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत होती. महाराष्ट्र केडरच्या बहुतांश अधिकाऱ्यांनी तपशील दिला आहे. मात्र काही अधिकाऱ्यांनी आपला खरा तपशील दडविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

हे आहेत टॉप ५ आयपीएस अधिकारी

१. संजयकुमार वर्मा – अतिरिक्त महासंचालक म्हाडा, १९९० बॅच, संपत्ती – एकूण ११ कोटी ६५ लाख

मालमत्ता – पुण्यात ४ फ्लॅट, मुंबई व नवी मुंबईत प्रत्येकी १ फ्लॅट, पुण्यात एक भुखंड, तर काही मालकी

२. परमबीर सिंग – महासंचालक एसीबी, बॅच -१९८८, एकूण संपत्ती ११ कोटी १० लाख
मालमत्ता – मुंबई व नवी मुंबई येथे प्रत्येकी १ फ्लॅट, हरियाणामध्ये जमीन, चंदिगढ मध्ये १ घर, तर

३. जे. व्ही, जाधव – बॅच २००४ , एकूण संपत्ती – १० कोटी ९५ लाख रुपये

मालमत्ता – कोल्हापूरात १ फ्लॅट, १ फार्म हाऊस, कोल्हापूर, सांगली, पुणे येथे ६ भुखंड

४. दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधिक्षक बुलढाणा एकूण संपत्ती – १० कोटी ६३ लाख रुपये

मालमत्ता – पुण्यात ४ घरे, १ फ्लॅट व १ गाळा, ९ भूखंड, वडीलोपार्जित मालमत्तेच्या हिश्श्यापोटी २ मालमत्ता

५. विनीत अगरवाल – विशेष संचालक (अंमलबजावणी संचलनालय) एकूण संपत्ती – ९ कोटी १० लाख

मालमत्ता – गाझीयाबादेत ४ गाळे, १ भुखंड, नोयडामध्ये १ भूखंड, १ निवासी भुखंड व वडिलोपार्जित मालमत्ता

टॉप ५ आयएसएस अधिकारी

१. भूषण गगराणी – प्रधान सचिव, (CMO) एकूण संपत्ती – १५ कोटी ९७ लाख रुपये

मालमत्ता : मुंबईत २, नवी मुंबईत १ फ्लॅट, मुंबईत १ गाळा. ४ भूखंड व कोल्हापुरात वडिलोपार्जित घर.

२. प्रविण दराडे – अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका, एकूण संपत्ती – १३ कोटी ४९ लाख रुपये

मालमत्ता – १४ भुखंड, १ व्यावसायिक वापरासाठी गाळा, यातील २ भुखंड वडीलोपार्जित

३. प्रविणसिंह परदेशी – अतिरिक्त मुख्य सचिव (CMO), १२ कोटी ५० लाख

मालमत्ता – परदेशात १, पुण्यात २ आणि मुंबईत एक फ्लॅट, मध्य प्रदेश व सोलापर येथे २ भुखंड

४. व्ही. राधा – सहसचिव, स्वच्छता मंत्रालय, एकूण संपत्ती – ११ कोटी ४२ लाख रुपये

मालमत्ता – मुंबईत २ फ्लॅट, पुणे, रायगड, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १ फ्लॅट, पुण्यात १ भुखंड

५. मनोज सौनिक – प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग एकूण संपत्ती – १० कोटी ९० लाख रुपये

मालमत्ता – मुंबई, नवी मुंबई व हरियाणात प्रत्येकी १ फ्लॅट, पुणे रायगड येथे शेतजमीन, बिहारमध्ये वडीलोपार्जित मालमत्ता