संजू सॅमसन फलंदाजीत झाला ‘फेल’ पण ‘फिल्डिंग’करून जिंकली सर्वांची मनं

माउंट माउंगानुई : वृत्तसंस्था – भारताने न्यूझीलंडला टी20 सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये 7 धावांनी हरवले आणि यासोबतच 5 मॅचची टी20 सीरीज क्लीन स्वीप करून नवीन विक्रम केला. या मॅचमध्ये संजू सॅमसन फलंदाजीत काही खास करू शकला नाही, पण त्याच्या फिल्डिंगने सर्वांची मने जिंकली.

न्यूझीलंंड टीमची बॅटींग सुरू असताना अनुभवी रॉस टेलरने शार्दुल ठाकुरचा बॉल पुल केला आणि बॉल बाउंड्रीच्या पलिकडे जाणार असतानाच बाउंड्री लाईनजवळ उभ्या असलेल्या सॅमसनने हवेत उडी मारून बॉल पकडला आणि बॉल आत टाकला. सॅमसनची ही जबरदस्त फिल्डिंग पाहून सर्वजन आश्चर्यचकीत झाले आणि टाळ्या वाजवू लागले. टेलरला सुद्धा याची शक्यता वाटत नव्हती की सॅमसन बॉल पकडू शकतो.

भारताने विजयासह प्रथमच 5 मॅचची टी20 सीरीज क्लीन स्वीप केली आहे. मॅचमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणार्‍या बुमराहला मॅन ऑफ द मॅच आणि राहुलला सीरीजमध्ये उत्कृष्ट खेळ केल्याने मॅन ऑफ द सीरीज अवॉर्ड मिळाले.