Sankarshan Karhade | झी मराठीवर लवकरच होणार नव्या ‘शो’ची एन्ट्री; संकर्षण कऱ्हाडे दिसणार नव्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – झी मराठीवर (Zee Marathi) लवकरच एक किचनशी संबंधीत एक शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) असे असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) करणार आहे. झी मराठीने नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यामध्ये संकर्षण (Sankarshan Karhade) म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून एकच दिसत आहे की, हा कार्यक्रम किचनशी संबंधीत आहे. त्यामुळे या शोची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. हा शो नेमका कसा असणार हे अजून समजू शकले नाही. मात्र संकर्षणला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

 

 

हा कार्यक्रम कधी आणि केव्हा सुरू होणार याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच हा शो आठवड्यातून किती दिवस असणार हेसुद्धा अजून समजू शकलेले नाही. तसेच दुसरीकडे ती परत आलीये (Ti Parat Aaliye) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या जागी देवमाणूस 2 (Devmanus 2) हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

 

संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा मराठी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता असून उत्तम लेखक व कवीदेखील आहे.
संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअ‍ॅलिटी शो यांच्यामध्ये काम केलं आहे.
सध्या तो झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत या मालिकेत काम करत आहे.
यासोबतच त्याच्या नाटकाचे देखील प्रयोग सुरू झाले आहेत.
यामुळे आता संकर्षणचे चाहते त्याला या नव्या भूमिकेत आणि नव्या कार्यक्रमात पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

Web Title :- Sankarshan Karhade | sankarshan karhade kitchen kallakar new tv show zee marathi Sankarshan in new role marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा