श्रावण संकष्टीचे गणेशभक्तात अनन्यसाधारण महत्त्व

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन  –   आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने या चतुर्थीचे गणेश भक्तामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण हा सणवारांचा महिना या महिन्याला हिंदू धर्मात खुप महत्व आहे त्यामुळे हा पवित्र समजला जातो हा संपूर्ण महिना उपवास तसेच वृत्ताचा महिना समजला जातो.
थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र येथे श्री चिंतामणी गणपतीच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन झाले आहे त्यामुळे प्रत्येक चतुर्थीस श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते परंतु मार्च महिन्यापासून शासनाने लाॅकडाऊन केल्यानंतर सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत त्यामुळे येथील मंदिर देखील दर्शनासाठी बंद आहे.परंतु अनेक गणेशभक्तांना दर्शनाची ओढ लागल्याने सर्व जण मंदिर उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दररोजचा नैमित्तीक विधी पार पडत असून आज पहाटे पाच वाजता देवालयाचे पुजारी किर्तीराज आगलावे यांनी महापुजा केली त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली अशी माहिती देवालयाच्या वतीने देण्यात आली. हे कोरोनाचे संकट लवकरच दूर होओ अशी प्रार्थना श्री चिंतामणी चरणी केल्याचे किर्तीराज यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like