सर्वात कमी वयाची पंतप्रधान बनली ‘ही’ महिला, ‘वय’ आणि ‘लिंग’ याबद्दल नाही विचार करत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 34 वर्षीय सना मरीन यांची फिनलँडच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे. सध्या त्या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत. सध्या त्या फिनलॅंडच्या दळणवळण मंत्री आहेत.

सना मरीन या सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांची आता पीएम पदावर नियुक्ती झाली. फिनलॅंडच्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. 55 लाख लोकसंख्या असलेल्या देशात एप्रिलमध्ये निवडणूका झाल्या होत्या. त्यात सोशल डेमोक्रेटिक पक्षाने मोठे यश मिळवले. परंतू सना यांना पंतप्रधान पदावर असलेल्या एन्टी रिने यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान पद मिळाले.

एन्टी रिने यांना पंतप्रधान पदाचा यासाठी राजीनामा द्यावा लागला कारण आघाडीतील सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका पक्षाने त्यांच्यावर अविश्वास दाखवला. रिने यांच्यावर आरोप होते की त्यांनी पोस्टल स्ट्राइक योग्यपणे हाताळला नाही.

त्यानंतर पंतप्रधान पदासाठी नाव समोर आल्यावर सना मरीन म्हणाले की आम्ही पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु. त्या म्हणाल्या की मी माझ्या वयात आपल्या जेंडरबद्दल कधीही विचार केला नाही. मी कायम या बाबात विचार केला ज्यांच्यामुळे मी राजकारणात आली आणि लोकांचा विश्वास जिंकला. न्यूझीलँडच्या पंतप्रधान देखील जैंसिंडा अर्डर्न महिला आहेत त्या 39 वर्षांच्या आहेत. तर यूक्रेनच्या पंतप्रधान ओलेक्सी होनचारुक या 35 वर्षांच्या आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like