Coronavirus : कोरोनाचा ‘खात्मा करणार हा ’क्रांतिकारी’ स्प्रे, नाकात जाईल आणि मारेल 99.99 % ‘व्हायरस’

ओटावा : कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत सध्या व्हॅक्सीनचे शस्त्र काम करत आहे. मात्र आता या लढाईत नवे शस्त्र समोर आले आहे. कॅनडाच्या एका कंपनीने (SaNOtize) एक स्प्रे तयार केला आहे. कंपनी दावा करत आहे की, हा स्प्रे नाकात टाकल्याने व्हायरस मोठ्या संख्येत कमी होतात. सोबतच स्प्रेच्या मदतीने रूग्णाच्या उपचाराचा कालावधी सुद्धा कमी केला जाऊ शकतो. याशिवाय गंभीर लक्षणांचा सामना करत असलेल्या रूग्णांची स्थिती सुद्धा चांगली होऊ शकते.

द सन चा रिपोर्ट सांगतो की, हा स्प्रे 99.99 टक्के व्हायरस मारतो. सोबतच व्हायरसला पसरण्यास प्रतिबंध करतो. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये झालेल्या लॅब टेस्ट सांगतात की, SaNOtize चा स्प्रे व्हायरसला वरील श्वासमार्गातच मारतो. यानंतर त्यास वाढणे आणि फुफ्फुसांकडे जाण्यास रोखतो. स्प्रे ने उपचार करणार्‍या रूग्णांमध्ये सुरुवातीच्या 24 तासात सरासरी व्हायरल रिडक्शन 1.362 होते.

आकडे पाहून समजले की व्हायरस 95 टक्केपर्यंत कमी झाले. तर, 72 तासात व्हायरल लोड 99 टक्केपेक्षा जास्त घसरला. ब्रिटनमध्ये झालेल्या ट्रायलचे प्रमुख तपासणीस डॉक्टर स्टीफन व्हिन्चेस्टर म्हणतात, मला आशा आहे की महामारी विरूद्धच्या जागतिक लढाईत हा मोठा विजय असेल, हे क्रांतिकारी आहे. भारतात सुद्धा अशाच प्रकारचे औषध बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोव्हॅक्सीन तयार करणारी कंपनी भारत बायोटेक कोरोफ्लू नावाने एक औषध तयार करत आहे. या औषधाचा वापर सिरींजऐवजी स्प्रे द्वारे केला जाईल. हे औषध समोर आल्यानंतर कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या रूग्णांचा उपचार सोपा होईल. कारण यामध्ये वेळ सुद्धा कमी लागेल. ही प्रक्रिया सुद्धा सोपी होईल. स्प्रेच्या मदतीने रूग्ण आणि आरोग्य कर्मचारी दोघांना दिलासा मिळेल.