संस्कार प्राथमिक शाळेला “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शाळा” पुरस्कार जाहीर

परळी वैजनाथ :  पोलीसनामा ऑनलाईन

नगर परिषद शिक्षण समिती व डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या वतीने यावर्षीपासून उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणार क्रांती ज्योती साविञीबाई फुले आदर्श शाळा पुरस्कार शहरातील संस्कार प्राथमिक शाळेला जाहीर झाला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, परळी नगर परिषद शिक्षण समितीच्या वतीने मागील वर्षीपासून परळी शहरातील शिक्षण क्षेञात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिना निमित्त क्रांतीबा जोतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने देण्यात येतो. यावर्षी शहरातील उत्कृष्ट शाळांना ही क्रांतीजोती साविञीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कारा न. प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी आज जाहीर केले. या पुरस्कारासाठी मराठी माध्यमातून प्राथमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक संस्कार प्राथमिक शाळेने पटकावला तर याच शाळेचे शिक्षक मधुकर इंगळे यांना क्रांतीबा ज्योतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’950ef26d-bd78-11e8-b74e-f94254715969′]

सर्व शाळांची तपासणी एका समिती मार्फत करण्यात आली असून आदर्श शिक्षक यांची ही निवड समिती मार्फत सर्वानुमते निवड केलेली आहे. या पुरस्कारांचे वितरण विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत व शानदार सोहळ्यात लवकरच होणार आहे. हा पुरकार मिळाल्याबद्दल संस्कार प्राथमीक शाळचे व शिक्षक मधुकर इंगळे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केलेआहे.

जेट एअरवेजच्या प्रवाशांकडून ३० लाखांच्या भरपाईची मागणी