संस्कृतमध्ये विशेष प्राविण्य मिळणाऱ्या ‘या’ 15 जणांना ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर 2019’, राष्ट्रपतींची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध पुरस्कारांची घोषणा केली असून प्रो. श्रीकृष्ण शर्मा, वाराणसीच्या प्रो. युगल किशोर व पंडित मनुदेव भट्टाचार्य, आणि दिल्लीच्या प्रो. चंद किरण सलुजा यांच्यासह १५ जणांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. संस्कृत, पाली, प्राकृत, अरबी, फारसी, शास्त्रीय कन्नड, तेलगू, मल्याळी भाषेत प्रभुत्व मिळवणाऱ्या या व्यक्तींचा सर्टिफिकेट ऑफ ऑनर आणि महर्षि बद्रायन व्यास २०१९ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने हे पुरस्कार देणार येणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी संस्कृत भाषेत विशेष प्राविण्य मिळवल्यामुळे श्रीपद सत्यनारायण मूर्ति, राजेंद्र नाथ शर्मा, प्रो रामजी ठाकुर, प्रो. चंद किरण सलुजा, डॉ. श्रीकृष्ण शर्मा, डॉ वी रामकृष्ण भट्ट, विद्वान जनार्दन हेगड़, डॉ कला आचार्य, डॉ.हरेकृष्ण सतपती, पंडित सत्यदेव शर्मा, बनवारी लाल गौर, डॉ.वीएस करुणाकरण, प्रो युगल किशोर मिश्र, पंडित मनुदेव भट्टाचार्य व सुबुद्धिचरण गोस्वामी यांना या भाषेसाठी पुरस्कृत करण्यात करण्यात येणार आहे.

तर पाली भाषेसाठी डॉ. उमा शंकर व्यास, प्राकृत साठी प्रो कमल चन्द सोगानी, शास्त्रीय कन्नडसाठी हम्पा नागराजैया, शास्त्रीय तेलुगूसाठी प्रो रव्वा श्रीहरि, शास्त्रीय मल्याळीसाठी डॉ सीपी अच्युतन उन्नी आणि और शास्त्रीय उड़िया साठी पंडित डॉ अतंरयामी मिश्रा यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. दरम्यान, या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असली तरी यांचे वितरण कधी होणार यांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like