Video : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त संस्कृत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल भारताच्या अनेक शहरांमध्ये प्रवासासाठी कॅब वापरणे सर्वसामान्य झाले आहे. कॅबची सेवा अत्त्यंत वेगवान आणि आरामदायी असल्यामुळे अनेकजण प्रवासासाठी कॅबचा वापर करतात. आपण जेव्हा कॅब मधून प्रवास करतो तेव्हा सर्वसामान्यपणे कॅब ड्रायव्हर आपल्याशी प्रादेशिक भाषा किंवा हिंदीचा वापर करत संवाद साधतात. काही ड्रायवर तोडक्यामोडक्या का होईना मात्र इंग्रजीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात कारण आपल्याला लहानपणापासून इंग्रजीचा वापर गरजेचे असल्याचे शिकवले जाते.

अनेक लोक इंग्रजी शिकणे आणि बोलण्यावर भर देतात कारण ते त्यांना प्रतिष्ठेचे वाटते. पण तुम्ही कधी कॅब ड्रायव्हरला अस्सलखीत संस्कृत बोलताना पहिले आहे का ? आपण विचार कराल कि ज्या विषयाची आपल्याला शालेय जीवनात भीती वाटत होती त्याचा दैनंदिन जीवनात वापर कसा करणार. पण बंगरुळू शहरात एक असा कॅब ड्राइवर आहे जो केवळ संस्कृत भाषेतच संवाद साधतो. या कॅब ड्रायव्हरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नेमके काय आहे व्हिडिओमध्ये
व्हिडिओमध्ये ड्रायव्हरसोबत व्हिडिओ बनविणारा व्यक्तीदेखील संस्कृत भाषेतच बोलतो आहे. पण तो व्यक्ती मात्र संस्कृतमध्ये बोलताना अडखळतो आहे. ड्राइवरप्रमाणे अस्सलखीत संस्कृत त्याला बोलता येत नाही. याउलट ड्रायवर मात्र मातृभाषेतून बोलल्याप्रमाणे सहजतेने संस्कृतचा वापर करत आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून लोकप्रिय होत आहे. अनेक लोकांनी केलेल्या कंमेंटनुसार लोकांनी त्याच्याकडून संस्कृत शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ड्रायव्हरने आपले नाव मल्लपम असे सांगितले आहे. संस्कृत कोठे शिकला असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितले कि एक शिबीर लागले होते ज्यामध्ये संस्कृत शिकविले जात होते. तेथेच त्याने संस्कृत बोलणे शिकून घेतले आणि आता तो आपल्या सर्व प्रवाशांबरोबर संस्कृतमधूनच संवाद साधतो.

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

You might also like