Sanskruti Balgude | त्याने सांगितलं माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत…, हे सर्व माझ्यासाठी फार शॉकिंग होतं – अभिनेत्री संस्कृती बालगुडे

पोलीसनामा ऑनलाइन – संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही आज मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Cinema) एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. संस्कृती सध्या ‘चौक’ (Chowk) या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका पार पडताना दिसणार आहे. देवेंद्र गायकवाड (Devendra Gaikwad) उर्फ दया दिग्दर्शित चौक चित्रपट येत्या 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चौक सिनेमाची सगळी टीम चित्रपटाच्या प्रमोशनला (Promotion) जोरदार लागली आहे. प्रमोशनदरम्यान एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान संस्कृतीने (Sanskruti Balgude) तिच्या पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगितला आहे.

 

https://instagram.com/sanskruti_balgude_official?igshid=MzRlODBiNWFlZA==

 

संस्कृती बालगुडे हिने याआधी फ्रेंडशिप अनलिमिटेड (Friendship Unlimited), भय (Bhay), सर्व लाइन व्यस्त आहेत (Sarva Line Wyastha Ahet ) अशा अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ती चौक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीमध्ये संस्कृतीला तू कधी कोणाला प्रपोज केलं आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर “मी आयुष्यात कधीच कोणाला प्रपोज केलं नाही,” असे उत्तर संस्कृतीने दिले. यानंतर तिला “तुला पहिलं प्रपोज आठवतंय का?” हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना संस्कृतीने पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगितला.

“माझ्या शाळेतला एक मुलगा होता. जो शाळेत असताना माझ्याशी कधी एक शब्दही बोलला नाही.
पण शाळेनंतर आम्ही चांगले मित्र झालो. दहावीनंतर मी कॉलेजमध्ये असताना त्याने मला प्रपोज केलं होतं.
माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत, असे त्याने सांगितले होते. हे सर्व माझ्यासाठी फार शॉकिंग होतं.
कारण, याआधी शाळेत असताना माझ्याकडे कोणीही बघायचं नाही. कोणीही मला भाव द्यायचं नाही.
त्यामुळे शाळेतल्या मित्राने मला प्रपोज केलं हे माझ्यासाठी शॉकिंग होतं,” असा पहिल्या प्रोपोजचा किस्सा
संस्कृतीने शेअर केला. (Sanskruti Balgude first propose)

येत्या 9 तारखेला संस्कृतीचा चौक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संस्कृतीबरोबर प्रवीण तरडे
(Pravin Tarde), स्नेहल तरडे (Snehal Tarde), रमेश परदेशी (Ramesh Pardeshi), किरण गायकवाड
(Kiran Gaikwad) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

Advt.

Web Title : Sanskruti Balgude | He said there are feelings about me…, all this was very shocking for me – Actress Sanskriti Balgude

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा, नांदेड खून प्रकरणावर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करण्यावर आक्षेप नसावा, पण…’, देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘मिठाचा खडा कुणी टाकण्याचा…’, मविआतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टच बोलले