Sanskruti Balgude | मला वाटलं माझ्यावर ॲसिड अटॅक वगैरे होतो की काय…? अभिनेत्री संस्कृती बालगुडेनी सांगितला ‘तो’ किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन – Sanskruti Balgude | मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि दमदार अभिनेत्री म्हणून संस्कृती बालगुडेची ओळख आहे. तिने आत्तापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सिरिजमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. संस्कृती आता रिलीज झालेल्या ‘चौक’ या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावत आहे. एका मुलाखतीदरम्यान संस्कृतीने (Sanskruti Balgude) तिच्या एका चाहत्याचा किस्सा सांगितला.

Advt.

नुकताच 2 जूनला चौक चित्रपट (Chowk Movie) प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संस्कृतीने तिच्या विचित्र चाहत्याचा किस्सा सांगितला.

तिला तिच्या चाहत्यांबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, “कधी कधी तू माझी बायको आहेस, तू माझी गर्लफ्रेन्ड आहेस, असे फॅन्सचे मेसेजेस येतात. पण मी त्यांना गांभीर्याने घेत नाही, कारण हे त्यांना वाटणारं आकर्षण असतं किंवा मी साकारलेल्या एखाद्या भूमिकेला मनात ठेवून ते असं बोलत असतात. असा माझा एक चाहता होता, जो मला असे मेसेज करायचा. मी कधीही त्याचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही. एकदा त्याचा मला फोन आला आणि मी त्याला समजावलं की या नंबरवर फोन करू नकोस आणि मी त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर त्याने माझ्या हेअर ड्रेसरचा नंबर मिळवला आणि ती माझ्याबरोबर काम करत असताना त्याने तिला फोन केला. मला हे कळल्यावर मी तिला सांगितलं, तो नंबर ब्लॉक कर.”

त्यानंतर ती म्हणाली, “दीड-दोन वर्षांपूर्वी मी पुण्यात (Pune) माझ्या एका दिग्दर्शक मित्राबरोबर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले.
मी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लोकेशनसह स्टोरी टाकली.
काहीच वेळात तोच माझा चाहता थेट माझ्यासमोरच उभा राहिला. तो आला तेव्हा त्याचे हात मागे होते.
त्याला पाहून माझी खूप धडधड वाढली. त्याने मला थेट विचारलं की, ‘तू का केलंस असं?’ अशा प्रसंगावेळी आपण
लगेच नकारात्मक विचार करायला लागतो. मला वाटलं ॲसिड अटॅक (Acid Attack) वगैरे होतो की काय.
पण माझ्या मित्राने हळूच मागे पाहिलं तर त्याच्या हातात काही नव्हतं. मग माझा मित्र त्याला बाहेर घेऊन गेला.
त्यानंतर दोन वेळा हाच चाहता माझ्या घरी देखील आला. त्यानंतर मात्र आम्ही त्याची पोलिसात तक्रार
(Police Complaint) केली, त्याला पोलिसांकडे नेलं. नंतर कळलं की त्याचे आई-वडील परदेशात राहतात.
त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर काहीतरी परिणाम झाला असावा, असंच म्हणावं लागेल.
मी असं केलं कारण शेवटी आपली सुरक्षा महत्त्वाची आहे.” (Sanskruti Balgude)

Web Title :  Sanskruti Balgude | marathi actress sanskruti balgude shared terrifies experience of her fan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

Railway Underpass In Khadki Pune | खडकी येथील रेल्वे अंडरपासचे होणार रुंदीकरण पुणे महापालिका देणार 25 कोटी रुपये

Pune Katraj Vikas Aghadi | कात्रजकरांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकार्‍यांसमवेत 8 जून रोजी कात्रज विकास आघाडीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन

NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल