Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी वाढपी बनून वारकऱ्यांची केली सेवा, सपत्नीक घेतले माऊलींचे दर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

राम कृष्ण हरी अवघी दुमदुमली पुण्यनगरी | नाचे हो वारकरी, आनंदले जन, पांडुरंग हरी |
मनी समाधान, कष्टा आले फळ, पोलीसांचे | अवघी ही मेहनत, समाधान वाटे या कष्टाचे |
साष्टांग नमन, विठ्ठल चरणी, वैष्णव सेवेचे |

 

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून खोळंबलेला वारीचा सोहळा यावर्षी पुन्हा वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे. बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यात मुक्कामी आला. यावेळी वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह अन् तीच ऊर्जा पहायला मिळाली. टाळ-मृदंगाच्या तालावर, वारकरी भजनात दंग झाले होते. अशा उत्साहात ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला. माऊलींच्या जयजयकाराने संपूर्ण आसमंत दुमदुमला.

 

 

पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी सपत्नीक संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. तसेच अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने सर्वसामान्य भक्तांप्रमाणे वारकऱ्यांसोबत प्रसादाचा लाभ घेतला. त्यापूर्वी गुप्ता दांम्पत्याने वारकऱ्यांची वाढपी बनून सेवा केली. पोलीस आयुक्तांनी आपल्या या कृतीतून जनसेवेसाठी सत्वर, पुणे पोलीस सदैव तत्पर असा संदेश दिला.

 

बुधवारी सकाळी आकुर्डी येथे विसावलेला तुकोबांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi) पुण्याच्या दिशेने निघाला. तर मंगळवारी रात्री आळंदी येथील आजोळघरी मुक्कामी असलेला माऊलींचा पालखी सोहळा देखील पुण्याच्या दिशेने निघाला. सायंकाळी पुणे-मुंबई रस्त्यावरुन (Pune-Mumbai Road) संचेती चौका नजीक दोन्ही पालखी सोहळ्यांची भेट झाली आणि लक्षावधी भाविकांच्या मुखातून जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष झाला. माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील मंदिरात तर तुकोबांचा पालखी सोहळा निवडुंग्या विठोबा मंद्रीत मुक्कामी विसावला. शुक्रवारी सकाळी दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत सोबत प्रवास करतील. माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवड डे तर तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतील.

 

Web Title :- Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | Police Commissioner Amitabh Gupta Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warakaris In Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात

 

Sole Pain | टाचेमध्ये सुया टोचण्यासारखे वाटते का? काळजी करू नका, ‘या’ उपायांचा अवलंब करा

 

Diabetes Tips | पाकातील गुलाबजाम खा किंवा जिलेबी, खाल्ल्यानंतर केवळ करा हे सोपे काम, कधीही वाढणार नाही Blood Sugar