संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयाची होणार ‘साफसफाई’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन –निरंकारी सदगुरू सुदिक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने मिशनचे चौथे सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंती निमित्त रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२०रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत विशाल स्वच्छता अभियान पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येणार आहे.

या अभियानात संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे ५००० हजारांहून अधिक स्वयंसेवक, सेवादल व अनुयायी या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी संदेश दिला होता की, प्रदूषण आतून असो किंवा बाहेरून असो दोन्हीही हानिकारक आहेत सद्गुरूंच्या आदेशानुसार ब्रम्हज्ञानाच्या माध्यमातून आत्मिक शुद्धतेसाठी अनेक ठिकाणी निरंकारी सत्संगचे आयोजन करण्यात येते. तसेच आपला जन्मदिवस साजरा करत असताना आपल्या परिसरातील असलेली शासकीय रुग्णालये, उद्याने व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवावे आसा संदेश आपल्या अनुयांना दिला होता.

या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये ११६६ हुन अधिक रूग्णालय व उद्याने स्वच्छ होणार आहेत. या स्वच्छता अभियानमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे येथील वाय. सी. एम. शासकीय रुग्णालय, ससून रूग्णालय तसेच हवेली तालुका व पुरंदर तालुक्यातील लोणी काळभोर, आव्हाळवाडी, मांजरी, उरुळी कांचन, वाघोली, सासवड, जेजुरी, राजेवाडी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान होणार आहे
या सामाजिक ऊपक्रमामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा व आपले शहर व आपले गाव स्वच्छ ठेवावे असे आवाहन संत निरंकारी मंडळ पुणे, झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी केले आहे.