दासनवमी 2020 : श्री मनाचे श्लोक पठणाने शहरात भक्तिमय वातावरण

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दासनवमीनिमित्त शहरात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभात फेरीत विद्यार्थांनी श्री मनाचे श्लोकाचे पठण केले. यामुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले. आज सोमवारी सकाळी साडे सात वाजता पांझरा नदी किनाऱ्यावरील समाधी मंदिराजवळ श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर विवेकानंद चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रभात फेरीला शुभारंभ करण्यात आला.

ही प्रभात फेरी समाधी मंदिरातून सुरु होऊन गांधी चौक, नगर पट्टी, गल्ली नंबर 6, चर्नी रोड, जे बी रोड, शहर चौकी मार्गाने जुना आग्रा रोड, सराफ बाजार, कराचीला चौक, श्री राम मंदिर, फुलवाला चौक, गांधी चौकातून मार्गस्थ होताना सगळ्यांनी मनाचे श्लोकांचे पठण केले. शहरातील विविध मार्गावरून ही रॅली मार्गस्थ झाली. यानंतर तासा भराने समाधी मंदिरात प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

दासनवमीनिमित्त श्री समर्थ वाग्देवता मंदिराच्या वतीने सालाबादाप्रमाणे काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉक्टर विवेकानंद चितळे प्राध्यापक देवेंद्र डोंगरे, विश्वास नकाणेकर, शंकरलाल जोशी, सतीश दिक्षित विवेक कुलकर्णी, रघुनाथ माळी, गोरख सूर्यवंशी, भरत कचवे मनीष बिडकर रवी बागुल विवेकानंद चितळे हायस्कूलचे विद्यार्थी, न्यू सिटी हायस्कूलचे विद्यार्थी, जोरा सिटी हायस्कूलचे विद्यार्थी, कमलाबाई कन्या शाळेतील विद्यार्थी, महाराणा प्रताप हायस्कुल महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने प्रभात फेरीत सहभागी झाले होते.