स्वत:साठी नव्हे तर लोकांना पैलतीरावर नेण्यासाठी ‘नाव’ पाण्यात वावरते, तसच संतांचं कार्य लोकांच्या कल्याणासाठी असतं

पोलीसनामा ऑनलाइन –

अर्भकाचे साटी | पंतें हाती धरिली पाटी ||१||
तैसे संत जगीं | क्रिया करुनी दाविती अंगी ||२||
बालकाचे चाली |माता जाणुनि पाउल घाली ||३||
तुका म्हणे नाव | जनासाटी उदकीं ठाव ||४||

संत तुकाराम महाराज अभंगात व्यक्त होताना सांगतात की, लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा उपदेश करीत असतात. परंतु, हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वत:च्या चारित्र्यानं प्राप्त केलेला असतो. लोकांना जे सांगायचं, ते आपण आधी करून दाखवायचं, ही त्यांच्या जगण्याची रीत असते. मुलानं हातात पाटी कशी धरावी, पेन्सिलीनं अक्षर कसं गिरवावं, हे त्याला शिकवताना शिक्षक आधी स्वत:च्या हातात पाटी घेतो.

आई मुलाला चालायला शिकवताना स्वत: एक-एक पाऊल चालून त्याला पावलं टाकायला शिकवते. नाव स्वत: पाण्यात वावरते, ती स्वत:साठी नव्हे, तर लोकांना पैलतीरावर नेण्यासाठी. संतांचं कार्य असंच लोकांच्या कल्याणासाठी असतं.

जो सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची काळजी वाहतो, तोच संत या नावाला साजेसा असतो.

– संत सेवक

‘विठोबा’चे नाम घेताच ‘क्षणार्धात’ कोट्यावधी पापांचा नाश होतो, नक्की वाचा 

‘भजन’, ‘अध्यात्मा’साठी किती वेळ तुमच्याकडं ? अर्धे आयुष्य झोपेत तर उरलेले ‘बालपण’ व ‘आजारपण’ 

देवाला फक्त प्रेमानं ‘हाक’ मारा, तो फुकट ‘नावाडी’ या भवसागरातून तारून नेण्यासाठी धावत येतो 

पसायदान ! ‘खराब’ माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट गुणांचा ‘नाश’ करण्याची प्रार्थना, जाणून घ्या 

‘बंधुप्रेम’ काय असतं, असावं तर ते ‘राम-लक्ष्मणा’सारखं, जाणून घ्या 

देहाचा कधी ‘नाश’ होईल सांगता येत नाही, म्हणून ‘या’ गोष्टींसाठी ‘घाई’ करा, जाणून घ्या 

समाजामध्ये ‘कसं’ राहावं ? ‘हा’ अभंग नक्की वाचा, सर्व काही समजेल