देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

संचितावाचून | पंथ न चलवे कारण ||१|| कोरडी ते अवघी आटी | वाया जाय लाळ घोटी ||२|| धन वित्त जोडे | देव ऐसे तो न घडे ||३ तुका म्हणे आड | स्वहितासी बहू नाड ||४|| (संत तुकाराम महाराज गाथा, अभंग क्र. १४९२)

जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की, परमार्थाला लागणे हे सुद्धा कोणाच्याही नशीबात नसते. परमार्थाला लागणे हे सुद्धा पुर्वसंचितावर अवलंबून असते. कोणालाही पटकन परमार्थ करता येत नाही. बाकी सर्व खटाटोप कितीही केला तरी व्यर्थ जातो. आणि देवाची कृपा होण्यासाठी लाळ घोटीत बसावे लागते. तसेच तुकोबाराय म्हणतात की, देवधर्मासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो असे अनेक लोकांना वाटते. पण तसे कधीही होत नाही. सर्व खटाटोप नेमकी देवाच्या प्राप्तीच्या आड येते.

परमार्थाला लागणे हे जरी पुर्वसंचितावर अवलंबून असले तरिही भगवंताच्या नामस्मरणाने पुर्वसंचित बदलता येते आणि भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणून अखंड, उठता-बसता, कोणतीही क्रिया करताना श्रीहरीचे नाम घ्यावे. शिंक आल्यावर अनेकजन साॅरी म्हणतात पण त्याऐवजी रामकृष्णहरी म्हणावे. एकमेकांना गुड माॅर्निंग, गुड नाईट म्हणण्याऐवजी रामकृष्णाहरी, जयहरी, म्हणावे. म्हणजे आपल्याला चालता बोलता नामस्मरण घडेल.