संत तुकाराम महाराजांची सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संभाजी महाराजांविषयी अतिशय आक्षेपार्ह लिखाण केल्याने सर्व शिक्षा अभियानाचे समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. यावरून सध्या वादंगही उठला आहे. या पुस्तकाच्या लेखिकेने व प्रकाशान यांनी माफी मागून वेळ मारून नेली आहे. यानंतर पुन्हा सर्व शिक्षा अभियानाच्याच दुसऱ्या पुस्तकात तुकाराम महारांजाबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8db346c-ce9a-11e8-857d-f98b8827ccfe’]

संतांचे जीवन प्रसंग या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याची बाब समोर आली आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. ते आमचं येडं असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले, असा उल्लेख या पुस्तकात आहे. या प्रकारावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली जाते आहे. चुकीची माहिती पुढे पसरवली जाते आहे.

[amazon_link asins=’B01AHSX0Z6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e73b041a-ce9a-11e8-b719-c578b4ec51c1′]

अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

राफेलच्या चौकशीची मागणी भाजप टाळू शकत नाही : शरद पवार