जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या ‘या’ 3 ‘हिता’च्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवाव्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

हित सांगे तेणे दिले जीवदान | घातकी तो जाण मनामागे ||1||

बळे हे वारावे अर्धम करितां | अंधळे चालता आडराने ||2||

द्रव्य देउनियां धाडावे तीर्थासी | नेदावे चोरासी चंद्रबळ ||3||

तुका म्हणे ऐसे आहे हे पुराणी | नाही माझी वाणी पदरीची ||4||

1) जो कोणी हिताचा उपदेश करतो त्याने आपल्याला जीवदान दिले असे समजावे. आणि जो मनाच्या मागे जातो-स्वतःच्या मनाप्रमाणे स्वैर वागतो तो स्वतःच्या हिताचा घात करणारा आहे असे समजावे.

2) एखादा मनुष्य अविचाराने अधर्म करण्यास प्रवृत्त झाला तर त्याला त्यापासून बळेच परावृत्त करावे. आंधळा आडरानाने चालत असता त्याचा हात धरून त्याला मार्गावर आणून सोडावे. कारण तसे करण्यात मोठे पुण्य आहे.

3) एखाद्याला पैसे देऊन तीर्थयात्रेला पाठवावे पण चोराला अमुक वेळेला गेल्यास तुला आज अनुकूल आहे ; असे सांगू नये कारण त्यात पाप आहे.

तुकाराम महाराज म्हणतात, हे मी माझ्या पदरचे सांगत नाही तर हे सर्व पुराणात सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/