पुणे पोलिसांचा प्रताप; संतोष जुवेकरवर केवळ पोस्टरवरून केला गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून संतोष जुवेकर तिथे आला नसताना देखील पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचा प्रताप केला असल्याचे समोर आले आहे.

मी पुण्यात आलोच नव्हतो : संतोष जुवेकर

दरम्यान, संतोष जुवेकर यांच्याशी याबाबतीत विचारले असता त्यांनी “पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र मी मागील महिन्याभरापासून मुंबई बाहेर पडलो नसून पुण्यात दहिहंडीच्या कार्यक्रमाला गेलो नव्हतो.तर आता गुन्ह्या प्रकरणी वकिलांचा सल्ला घेणार आहे.” असे स्पष्टीकरण दिले आहे.

या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक व्ही.आर.पुराणिक यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले ” पुण्यातील अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने दहीहंडी साजरा करताना. ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणण्याचे काम केले. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक यांच्यासह सिनेअभिनेता संतोष जुवेकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संतोष जुवेकरवर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जर ते कार्यक्रमास आले नसतील तर त्यांच्यावरील गुन्ह्यातील नाव वगळण्यात येतील”. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
[amazon_link asins=’B076H74F8N,B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b46bb335-b0e0-11e8-bac4-5faf228c070d’]

काय आहे प्रकरण

अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंट माल विजय नरुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.
अरण्येश्वर चौकात दहीहंडी उत्सव मंडळाने विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी स्टेजची रोडवर बांधणी करुन त्यावर कार्यक्रम आयोजित केला होता.

मोठ्या क्षमतेची साऊंड सिस्टिम लावून जाणून बुजून ध्वनी प्रदुषण केले. तसेच रहदारीला अडथळा निर्माण केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले. त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.आर. पुराणीक करीत आहेत.

अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल